गृहनिर्माण मसुद्यासाठी सूचना, हरकती मागवल्या

0
5

राज्य सरकारने गोवा गृहनिर्माण (नोंदणी, भूखंडाचे वाटप आणि विक्री) नियम 2024 चा मसुदा जारी केला असून, या मसुद्यासाठी सूचना, हरकती सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी या मसुद्याबाबतच्या सूचना, हरकती पर्वरी येथील सचिवालयातील गृहनिर्माण खात्याच्या संयुक्त सचिवांकडे (गृहनिर्माण) सादर कराव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीमध्ये प्राप्त होणाऱ्या सूचना, हरकतींचा विचार केला जाणार आहे, असे सूचनेत म्हटले आहे. नियमामध्ये 2016 साली दुरुस्ती करण्यात आली होती. आता, पुन्हा दुरुस्ती केली जात आहे. या मंडळाच्या नोंदणी, भूखंड वाटप आणि विक्री नियमांमध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत.