राज्यात गुरांच्या कत्तलीवर बंदी आणावी या मागणीसाठी गोवंश रक्षा अभियानतर्फे कालपासून येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू झाले. आणखी दोन दिवस हे धरणे आंदोलन चालू राहणार आहे, असे कमलेश बांदेकर यांनी सांगितले.
धरणे आंदोलनाला भारत स्वाभिमान, विश्व हिंदू परिषद, सनातन, हिंदू जनजागृती समिती, ऍनिमल रेस्क्यू स्कॉड आदी विविध संघटनांचा पाठिंबा आहे. गोवंश हत्या बंदी लागू करावी अशी मागणी असल्याचे सांगून ईदनिमित्त राज्यात उघड्यावर कत्तली करण्यावर न्यायलयाने जी बंदी घातलेली आहे तिचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष दिले जाण्याची मागणी असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.
न्यायालयाने ईदनिमित्त होऊ घातलेल्या गुरांच्या कत्तली या केवळ गोवा मांस प्रकल्पातच व्हाव्यात असा आदेश दिलेला असल्याने या कत्तली तेथेच केल्या जाव्यात अशी मागणी असल्याचे बांदेकर म्हणाले.