जीसीझेडएमने दाखल केलेल्या एका तक्रारीसंबंधी काल गुन्हा अन्वेषण पोलिसांनी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना समन्स पाठवून त्यांची जबानी घेतली. गुन्हा अन्वेषण पोलिसांनी रायबंदर पोलीस चौकीवर त्यांची जबानी घेतली. दरम्यान, खाण घोटाळाप्रकरणी काल विशेष तपास पथकाने खाण खात्याचे माजी संचालक अरविंद लोलयेकर, जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंते जगदीश होसमणी व कृषी खात्याचे माजी उपसंचालक गिरीश कामत यांना समन्स जारी केले.