गुणवत्ता यादी जाहीर; 29,400 विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश

0
16

राज्यातील विविध महाविद्यालयामधील प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी काल जाहीर करण्यात आली असून, महाविद्यालयात प्रवेशाच्या पहिल्या फेरीत राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे 29,400 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
राज्यातील महाविद्यालयांमध्ये आणखी सुमारे 9500 जागा अजूनही रिक्त आहेत आणि त्यामुळे प्रवेशाची दुसरी फेरी लवकरच जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण खात्याचे नोडल अधिकारी डॉ. महादेव गावंस यांनी काल दिली.

राज्यातील महाविद्यालयातील प्रवेशाच्या गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनाही महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.