गुजरातमधील जामनगर शहराच्या बाहेर बुधवारी रात्री उशिरा एक लढाऊ विमान कोसळले. ही घटना कलावड रोडवरील सुवर्णा गावाजवळ घडली. या अपघातातून एक पायलट बचावला, तर दुसरा पायलट बेपत्ता आहे. अपघातानंतर विमानाचे अनेक तुकडे झाले आणि त्याला आग लागली. या अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य राबवले. बेपत्ता असलेल्या पायलटचा शोध घेतला जात आहे. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.