काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधीच्या सभापतींच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी आपली याचिका काँग्रेस नेते तथा गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल मागे घेतली.
सभापतींनी पक्षांतर केलेल्या आठ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीची आपली याचिका फेटाळल्यानंतर गिरीश चोडणकर यांनी सभापतींच्या या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीवेळी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी सभापतींच्या आदेशाविरोधात घटनेच्या कलम 135 खाली आव्हान याचिका दाखल झालेली असून, सदर कलमाखाली सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सरन्यायाधीशांनी चोडणकर यांना या प्रकरणी 226 खाली उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे निर्देश दिले.