गांधी चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड ऍटनबरो यांचे निधन

0
150

’गांधी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि ऑस्कर पुरस्कार विजेते रिचर्ड सॅम्युयल ऍटेनबरो यांचे रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. रिचर्ड ऍटेनबरो काही दिवसांपासून आजारी होते.
रिचर्ड हे हॉलिवूडमधील एक अत्यंत यशस्वी दिग्दर्शक होते. त्यांनी आपल्या अभिनयातून सिनेरसिकांच्या मनात घर निर्माण केलं. ’ब्रायटन रॉक’, ’द ग्रेट एस्केप’, ’ज्युरासिक पार्क’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. ’ज्युरासिक पार्क’ या सिनेमातील भूमिका विशेष गाजली. ’गांधी’ या चित्रपटाने रिचर्ड ऍटेनबरो भारतात नवी ओळख करून दिली. याच चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. या चित्रपटात बेन किंग्जले यांनी महात्मा गांधींची तर रोहिणी हट्टंगडी यांनी कस्तुरबा गांधींची भूमिका केली होती.