गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने बादे-आसगाव येथे छापा घालून इनाओ शायझा (41, रा. मणिपूर) याला इसमाला अटक केली असून, त्याच्याकडून 1.35 लाख रुपये किमतीचे 7.770 ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री करण्यात आली. संशयित आरोपी इनाओ शायझा याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला. इनाओ याच्याकडून ‘एमडीएमए’ हे अमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे. संशयित ड्रग्स तस्कराबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती.