गव्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

0
8

मंगल शांताराम गावडे (60) या बोणबाग – बेतोडा येथील महिलेवर गव्याने हल्ला केल्याने उपचार सुरू होते. मात्र काल रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला.
फोंडा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. घराजवळ आलेल्या गव्याला हाकलून लावण्याच्या प्रयत्नात असताना महिलेवर गव्याने हल्ला करून तिला जखमी केले होते.

शनिवारी संध्याकाळी मंगल गावडे या महिलेच्या घराजवळ गवा दिसून आला. त्यामुळे गव्याला हाकलण्यासाठी गेलेल्या महिलेवर गव्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. जखमी महिलेला सर्वप्रथम उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचार करण्यासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला.

श्वानहल्ल्यातील जखमीचे उपचारादरम्यान निधन
श्वान हल्ल्यात जखमी झालेल्या वास्को येथील विद्युत खात्यातील मीटर रीडर रविकांत ऊर्फ बिपीन चोडणकर यांचे काल गोमेकॉत उपचार सुरू असताना निधन झाले. चोडणकर यांच्यावर उपचार सुरु होते.