>> मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने माजी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग (आयपीएस) यांच्याविरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा उत्तर जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरविला आहे.
येथील उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाला लाच प्रकरणी माजी पोलीस महानिरीक्षक गर्ग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. सरकारी अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारी मान्यता आवश्यक आहे. वास्को येथील व्यावसायिक मुन्नालाल हलवाई यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून गर्ग यांच्या विरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा असे म्हटले होते.