राज्यात गत २०१९ च्या तुलनेत या वर्षी २०२० मध्ये मोसमी पावसाची सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त नोंद झाली आहे. या वर्षी सरासरीपेक्षा ४१ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर, गतवर्षी सरासरीपेक्षा ३३ टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती. राज्यात यावर्षी मोसमी पावसाने नवीन विक्रम नोंदविला असून १६५.४२ इंच पावसाची नोंद झाली आहे. वर्ष १९६१ मध्ये १६० इंच पावसाच्या नोंदीचा यंदा विक्रम मोडला आहे. गत वर्ष २०१९ मध्ये १५५.२६ इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा उत्तर गोव्यात ४२ टक्के आणि दक्षिण गोव्यात ४१ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.