गणेशोत्सवात राज्यात मुसळधार

0
5

>> उद्याही जोरदार पावसाचा अंदाज

बंगालच्या वायव्य उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात श्रीगणेश चतुर्थीच्या काळात पावसाच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाली आहे. राज्यात चोवीस तासांत 1.39 इंच पावसाची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने राज्यात येत्या 11 सप्टेंबर 2024 पर्यत काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून एलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात आतापर्यंत 161.81 इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण 46.2 टक्के जास्त आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले वादळाने ओडिशा राज्यातील पुरीजवळील समुद्र किनारा ओलांडला वायव्य दिशेकडे सरकले आहे.
राज्यात श्री गणेश चतुर्थीच्या काळात मागील दोन दिवसांपासून पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोवीस तासांत राज्यातील सर्वच भागात पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे सर्वाधिक 1.77 इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे 1.59 इंच, म्हापसा येथे 0.94 इंच, पेडणे येथे 1.39 इंच, फोंडा येथे 1.57 इंच, पणजी येथे 1.11 इंच, जुने गोवा येथे 1.53 इंच, साखळी येथे 1.43 इंच, वाळपई येथे 1.05 इंच, दाबोळी येथे 1.35 इंच, मडगाव येथे 1.26 इंच, मुरगाव येथे 1.35 इंच पावसाची नोंद झाली आहे.