गणपतीपुळे समुद्रात दोघांचा बुडून मृत्यू

0
9

गणपतीपुळे येथील समुद्रात दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी संध्याकाळी घडली. पर्यटनासाठी आलेले तीन मित्र गणपतीपुळ्याच्या समुद्रात बुडाले. त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आले. मात्र दोघांना आपला जीव गमवाला लागला. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यातल्या एकाला तिथल्या स्थानिक लोकांनी वाचवले. पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेजण बुडाले. मृत झालेले दोघे जेएसडब्ल्यूचे कंत्राटी कर्मचारी आहेत. प्रदीप कुमार आणि मोहम्मद असिफ अशी मृतांची नावं आहेत. त्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे.