गडकरींची १६ रोजी पणजीत प्रचारसभा

0
94

विधानसभेच्या पणजी पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या १६ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल दिली.

केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. गोव्यातील मतदार प्रक्रिया पूर्ण झालेल्या तीन पोट निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून येणार आहेत, असा दावा तेंडुलकर यांनी केला.

पणजी मतदारसंघात भाजपचा विजय निश्‍चित आहे. मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला भरघोस पाठिंबा मिळत आहे. भाजपचे नेते, कार्यकर्ते प्रचार कार्यात गुंतलेले आहेत. पणजीतील प्रचारासाठी नितीन गडकरी यांची सभा होणार आहे. या सभेसाठी जागा निश्‍चित झालेली नाही, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
लोकांच्या मागणीनुसार भाजपने राज्य सरकारला मांडवी नदीतील कॅसिनो बंद करण्याची सूचना केलेली आहे. सरकारकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तेंडुलकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना दिली.

राज्यात भाजपची झालेली वाढ केवळ एकट्या व्यक्तीमुळे झालेली नाही. तर, भाजपच्या वाढीमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे योगदान आहे. कुणा एकट्याला यशाचे श्रेय देणे चुकीचे आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.