इस्रोच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी चार अवकाशयात्रींची निवड करण्यात आल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख के. सिवन यांनी काल पत्रकारांना दिली. या अवकाश यात्रींसाठी जानेवारीच्या तिसर्या आठवड्यापासून रशियात प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेद्वारा गगनयान या अंतराळ यानातून अवकाशयात्रींना किमान सात दिवसांसाठी अंतराळात २०२२ पर्यंत पाठविले जाणार असल्याची माहिती सिवन यांनी दिली.