दिल्ली गँगरेपवर बीबीसीने डॉक्युमेंट्री प्रसारित केल्याप्रकरणी भारत सरकारने काल बीबीसीला नोटीस बजावली असून यानंतर युट्यूबवरून सदर डॉक्युमेंट्री हटविण्यात आली आहे. बुधवारी उशिरा रात्री ब्रिटनमध्ये बीबीसीने ही डॉक्युमेंट्री दाखवली होती. यानंतर अनेकजणांनी ती यु-ट्यूबवर अपलोड केली होती. या प्रकाराने देशभर खळबळ माजल्यानंतर भारताने ती यु-ट्यूबवरून काढण्यास सांगितले होते. गृहमंत्रालयाबरोबर झालेल्या चर्चेत भारत सरकारच्या आदेशानुसार भारतात डॉक्युमेंट्री तसेच गँगरेप आरोपी मुकेश सिंहची मुलाखतीचे प्रसारण करणार नसल्याचे बीबीसीने सांगितले आहे. दरम्यान, दिल्ली न्यायालयाने डॉक्युमेंट्री बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे.