ख्रिस्ती धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव

0
4

>> संकल्प आमोणकर, गिरिराज वेर्णेकर यांचा थेट आरोप

लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचा पराभव केवळ ख्रिस्ती धर्मगुरुंनी केलेल्या हस्तक्षेपामुळे झाला, असा थेट आरोप भाजपचे आमदार संकल्प आमोणकर आणि प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.

दक्षिण गोव्यात ख्रिस्ती धर्मगुरुंच्या हस्तक्षेपामुळे पराभव झाला आहे, या भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या विधानाचे त्यांनी समर्थन केले. लोकसभा निवडणुकीत ख्रिस्ती धर्मगुरुंनी हस्तक्षेप केला नसता, तर वेगळेच चित्र पाहायला मिळाले असते, असे आमोणकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांची चर्चच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर संयुक्त छायाचित्र घेण्यास मनाई करण्यात आली होती, असा दावाही आमोणकर यांनी केला.

दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत धर्मगुरुंचा हस्तक्षेप पूर्णपणे चुकीचा आहे, असे गिरिराज पै वेर्णेकर यांनी सांगितले.गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे इंडिया आघाडीचे चीअर लीडर आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.