खोलाच्या विकासासाठी कोट्यवधींची तरतूद : सावईकर

0
95

खासदार योजनेखाली आपण दत्तक घेतलेल्या खोला पंचायतीचा विकास करण्यासाठी खासदार निधीतून एक कोटी रु. तर केंद्र व राज्य सरकारच्या अन्य विविध योजनांखाली अन्य कित्येक कोटी रु. खर्च करण्यात येणार असल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. झर्‍याचे संवर्धन, किनार्‍याची साफसफाई, तेथे जलक्रीडांचे आयोजन करणे, बँक व एटीएम सुरू करणे, मिरचीच्या जातीचा जीआय् करणे आदी कामे हाती घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले.