आल्त-पर्वरी येथील रामनगर दर्ग्याजवळ असलेल्या प्रवेशद्वारावर एक 12 वर्षाचा मुलगा खेळता खेळता चढला आणि पाय घसरून तो खाली पडला. त्याचवेळी प्रवेशद्वाराची लोखंडी सळी त्याच्या गालात घुसली आणि तो गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या सहाय्याने लोखंडी सळीचा तुकडा कापला आणि सदर मुलाला त्वरित गोमेकॉमध्ये दाखल केले. जखमी मुलाची प्रकृती स्थिर आहे.