राज्यात १२५ ते १५० मेगावॅट एवढ्या विजेचा तुटवडा असून, तो भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्याचा खात्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठीची फाईल आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पाठवणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या खरेदीला हिरवा कंदील दाखवल्यास खुल्या बाजारातून ही वीज खरेदी केली जाईल, अशी माहिती काल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
राज्यात उन्हाळ्याच्या दिवसांत १२५ ते १५० मेगावॅट एवढ्या विजेचा तुटवडा जाणवत असतो; मात्र खुल्या बाजारातून वीज खरेदी केली, तर हा प्रश्न सुटू शकणार आहे. त्यासाठीच हा प्रस्ताव विचाराधीन असून, त्यासाठीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.