खासगी क्लासेससाठी सरकारची नवी नियमावली

0
18

गेल्या काही वर्षांपासून खासगी कोचिंग क्लासेसचे प्रस्थ वाढले आहे. चांगल्या शाळा-कॉलेजात प्रवेश घेतल्यानंतर पालक आपल्या पाल्याला चांगल्या शिक्षणाच्या आशेने खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेऊन देतात. पालकांचा ओढा जास्त वाढल्याने खासगी कोचिंग क्लासेसचालकांनीही खोटी आमिषे आणि फसव्या जाहिराती करून पालकांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आता शिक्षण मंत्रालयाने या सर्वांवर चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंत्रालयाने नवे मार्गदर्शक तत्वे जाहीर केले असून, त्यानुसार 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. तसेच, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चांगल्या गुणांची हमी देणे बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहेत. त्याशिवाय कोटिंग सेंटर चालवणाऱ्यांना विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करता येणार नाही. नियमावलीतील व्याख्येनुसार 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जिथे शिक्षण दिले जाते, त्या जागेला कोचिंग क्लास समजले जाईल. कोचिंग क्लासेसने नियम मोडल्यास आर्थिक दंडाचा सामना करावा लागणार आहे.