खारफुटीच्या वनक्षेत्रांचे सर्वेक्षण करणार : वनमंत्री

0
9

राज्यातील खारफुटीचे वनक्षेत्र हे राज्यातील नैसर्गिक परिसंस्थेसाठी आवश्यक असून, हे वनक्षेत्र नष्ट झाल्यास राज्यातील सजीवसृष्टीचा समतोल धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे राज्यातील खारफुटींच्या वनक्षेत्रांचे तपशीलवारपणे सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश वन खात्याच्या विशेष मुख्य वनसंवर्धकांना करण्यात आली आहे, अशी माहिती काल वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

खारफुटीचे वनक्षेत्र असलेले तब्बल 3500 सर्वे क्रमांक राज्यात आहेत. या सर्वे क्रमांकांखाली असलेले सर्व खारफुटीचे वनक्षेत्र हे संरक्षित विभाग म्हणून निश्चित करण्यात यावेत. तसेच त्यासंबंधीचा तपशीलवार अहवाल सादर करण्यात यावा, असे वन खात्याला कळवण्यात आले असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. अशा संरक्षित खारफुटीच्या वनक्षेत्रात जर कुणीही अनधिकृतरित्या अतिक्रमणे केली, तर ते सहन केले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल याकडे लक्ष देण्याची सूचनाही राणे यांनी वन खात्याला
केली आहे.