भाजप सरकारवर फोन्सेकांची टिका
भाजप सरकारचा खाण बंदीचा निर्णय अयोग्य होता. या निर्णयाचा गोव्याच्या समाजावर विपरीत परिणाम झालेला आहे, असे सांगून निवडणुकीच्यावेळी भाजपने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यास भाजप अपयशी ठरल्याचा आरोप भाकपचे प्रदेश अध्यक्ष ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
बेरोजगारांना दरमहा ४५०० रु. बेकारी भत्ता, गोव्याला विशेष दर्जा, कॅसिनो खोल समुद्रात पाठविणे, प्रादेशिक आराखडा, अशी अनेक आश्वासने दिली होती. पर्रीकर सरकारने ती अजून पूर्ण केली नाही. कॉंग्रेसने भ्रष्टाचार केला म्हणून जनतेने भाजपला सत्तेवर आणले. निवडून आलेले कॉंग्रेस आमदारही भाजपसमोर भेदरल्याप्रमाणे वागत आहेत, असे सांगून यापुढे जनतेने अशा लोकांना विधानसभेत पाठवू नये, असे आवाहन फोन्सेका यांनी केले.