भाजपने राज्यात ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. हा आरोप भाजप सरकारने सिद्ध करावा; अन्यथा जनतेची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. भाजपने ३५ हजार कोटी रुपयांचा खाण घोटाळा झाल्याचा आरोप करून १० वर्षे उलटली आहेत. सरकारने खाण घोटाळ्याचे पुरावे सादर करावेत किंवा तमाम जनतेची माफी मागावी, असे चोडणकर यांनी सांगितले.