खाण घोटाळा ः एसआयटीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

0
124

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मडगाव येथील खास न्यायालयाच्या खाण घोटाळा प्रकरणात समीर व अर्जुन या साळगावकर बंधुंना दोषमुक्त करण्याच्या निवाड्याला आव्हान देणारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) याचिका काल फेटाळली.
खाण खात्याचे तत्कालीन संचालक प्रसन्न आचार्य यांनी २०१४ मध्ये खाण घोटाळा प्रकरणी तक्रार दाखल केली होती. वर्ष २००९ मध्ये खाण घोटाळ्याचे प्रकरण घडल्याचे तक्रारीत म्हटले होते. खाण प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त एसआयटीने खाण घोटाळा प्रकरणी खाण उद्योजक समीर व अर्जुन साळगावकर यांच्याविरोधात २०१६ मध्ये मडगाव येथील खास न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.