नव्याने स्थापन झालेल्या केंद्राच्या केंद्रीय सल्लगार समिती (कॅक)ने काल खाणींवर काम करणार्या कामगारांसाठी विविध कल्याणकारी उपाययोजनांची शिफारस केली. यात ७५ हजार रुपयांच्या गृह अनुदान योजनेचा समावेश आहे.
ही अनुदान योजना राज्य सरकार आणि वित्तीय संस्थांच्या सहकार्याने राबविण्याचे समितीने सुचवले आहे.
नव्याने स्थापन झालेल्या या सल्लागार समितीची पहिली बैठक काल केंद्रीय मजूर मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी केंद्रीय ट्रेड युनियनचे प्रतिनिधीही उपस्थित होते. लोहखनिज, मँगनिज, क्रोम खनिज खाणींसंबंधी ही समिती आहे. खाणींवरील कामगारांच्या वार्षिक तपासणीची योजना राबविण्याचेही समितीने सूचवले. सर्व कामगारांची नोंदणी राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजनेखाली करण्यासाठी कामगार संघटनांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन समितीने केले. सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी खाण कंपन्यांच्या व्यवस्थापनांनी कार्यशाळा आयोजित कराव्यात अशी शिफारस समितीने केली आहे.