कोडली येथे वेदांता खालण कंपनीत गेल्या शनिवारी डंप कोसळल्याने गाडल्या गेलेल्या मनोज नाईक कळंगुटकर या कामगाराचा शोध सोमवारही घेण्यात आला. मात्र संध्याकाळपर्यंत शोध घेतल्यानंतर काम थांबविण्यात आले. खांडेपारवासियांनी दिवसभर खाणीच्या गेटसमोर ठाण मांडले. मात्र शोध लागला नसल्याने रात्री उशीरा माघारी परतले. मनोज नाईक कळंगुटकर याचा शोध लागेपर्यंत खनीज वाहतूक सुरू न करण्याचे आवाहन खांडेपारवासियांनी केले आहे.
दरम्यान, काल दुपारी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एनडीआरएफ, नौदल तसेच पोलीस घटनास्थळी शोधकार्य करीत आहेत. मात्र डंप सुमारे दिडेशे मीटर खाली कोसळल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या दुर्घटनेप्रकरणी खाण खाते व पोलिसांनी कंपनीविरुध्द तक्रार नोंदवण्याची गरज होती असे रेजिनाल्ड म्हणाले.