खाणींसाठी सरकारवर दबाव आणा

0
210

>> विरोधी नेत्यांस साकडे

गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटच्या शिष्टमंडळाने काल सचिवालयात विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांची भेट घेऊन खाण उद्योग लवकर सुरू करण्यात यावा यासाठी गुरुवारपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनात सरकारवर दबाव आणावा अशी मागणी करणारे निवेदन त्यांना सादर केले. राज्यातील खाण व्यवसाय बंद पडल्याने खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या खाण पट्‌ट्यातील जनतेची स्थिती दयनीय झालेली असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असल्याचे शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार्‍या विनायक गावस यांनी यावेळी कवळेकर यांच्या नजरेस आणून दिले.
राज्यातील खाण व्यवसाय लवकर सुरू करण्यात यावा अशी मागणी करणारा ठराव विरोधी कॉंग्रेसने अधिवेशनात आणावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. यावेळी कवळेकर यांनी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग लवकर सुरू झालेला हवा आहे. त्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणू तसेच अन्य आवश्यक ते सर्व काही करू असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.