पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री सावंत यांनी काल व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी यांनी याबाबत एक उच्चस्तरीय बैठक गुरूवारी घेतली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महसूल वाढविण्याची नितांत गरज आहे. खाण व्यवसायाची महसूल वाढविण्यासाठी मदत होऊ शकते. राज्य सरकारच्यावतीने पंतप्रधान मोदी व इतरांना खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवून खाण व्यवसाय सुरू करण्याची विनंती केली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
राज्यातील सीमा बंद ठेवून लॉकडाऊन कायम ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. राज्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक तूर्त सुरू केली जाणार नाही. केंद्र सरकारच्या ३ मेनंतर येणार्या नवीन मार्गदर्शक सूचनाप्रमाणे व्यापारी आस्थापनांबाबत आवश्यक निर्णय घेतला जाणार आहे.