सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाणप्रश्नी एका याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली असून या याचिकेवरील पुढील सुनावणी १८ ऑगस्ट २०२० रोजी घेतली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात वेदांत या खाण कंपनीने खाणप्रश्नी एक याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर गेल्या १६ जुलैला सुनावणी निश्चित करण्यात आलेली होती. परंतु सदर याचिका सुनावणीच्या यादीतून वगळण्यात आली होती. सदर याचिकेवर गुरूवार दि. २३ जुलैला सुनावणी घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने खाणबंदी प्रश्नी फेरविचार याचिका दाखल केली आहे. खाणप्रश्नी याचिकेवर जलद सुनावणी घेण्याची विनंती राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात करण्यात आली आहे. राज्यातील खाण व्यवसाय बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१८ मध्ये दिलेला आहे.