खाणप्रश्‍नी न्यायालयाकडून न्याय मिळेल ः मुख्यमंत्री

0
109

>> दिल्लीत उद्या सुनावणी

खाणप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालय गोव्याला न्याय देईल असा विश्‍वास काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यातील बंद पडलेल्या खाणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची बाजू व्यवस्थितपणे मांडली आहे. त्यामुळे आम्हाला न्याय निश्‍चितपणे मिळेल, असे काल डॉ. सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

खाणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या दि. १६ रोजी सुनावणी होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. गोव्याच्यावतीने ऍड. तुषार मेहता हे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

गेल्या दि. २१ एप्रिल रोजीच सर्वोच्च न्यायालयात खाणप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे न्यायालये बंद असल्याने ही सुनावणी होऊ शकली नव्हती.