खाणपट्टे वाटप अधिसूचना जारी

0
102

केंद्र सरकारने खाण व खनिज नियमन कायद्यामध्ये सुधारणा अध्यादेशाद्वारे अंमलात आणल्यानंतर गोवा सरकारने आपले गोवा खाणपट्टे वाटप धोरण २०१४ राजपत्रातून अधिसूचित केले आहे. खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांच्या सहीने ही अधिसूचना जारी झाली आहे. केंद्र सरकारने खाण कायद्यात केलेले बदल, देशाचे संविधान व राज्य सरकारचे खाण धोरण यांच्या अनुषंगाने ही खाणपट्टे वाटप धोरणाची अधिसूचना काढण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे.