खर्गेंचे पंतप्रधानांबाबत वादग्रस्त वक्तव्य

0
5

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मल्लिकार्जुन खर्गे यांचा काल संयम सुटला. कर्नाटकातील कलबुर्गी येथील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विषारी समजा किंवा समजू नका. मात्र या विषामुळे तुम्ही मरुन जाल, असे वक्तव्य खर्गे यांनी केले. त्यानंतर भाजपने त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे.

मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्या वक्तव्याचा संदर्भ पंतप्रधान मोदींसाठी नाही, तर भाजपच्या विचारसरणीसाठी होता. आपण पंतप्रधानांसाठी अशा प्रकारचे शब्द कधीच वापरले नाहीत. भाजपची विचारसरणी ही सापासारखी आहे, तुम्ही त्याला स्पर्श केलात तर मृत्यू होईल, असे विधान आपण केले होते, असे स्पष्टीकरण खर्गे यांनी दिले.