खरे ‘युवक’ नेमके कोण?

0
1177
  • ऍड. असीम सरोदे

तरुणाईची एक झिंग असते. त्यामध्ये बदल घडवून आणण्याची, परिवर्तनाची आस असते. अन्यायाची चीड असते. ही चीड माझ्यापुरती किंवा तडङ्गडण्यापुरती मर्यादित न ठेवता त्याचे परिवर्तनात रुपांतर करणे आाणि लोकशाहीच्या माध्यमातून बदल घडवून आणणे अशी एक भूकच आपोआप निर्माण होते. या भूमिकेतून काम करणारे खर्‍या अर्थाने युवक आहेत…

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन येत्या १२ जानेवारीस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणाने मांडणे आवश्यक आहे, ती म्हणजे आपल्याकडे विवेकानंदांची ओळख चुकीच्या पद्धतीने करून देण्यात आली आहे. विवेकानंद भगव्या अथवा अन्य कोणत्याही रंगापुरते सीमित नाही. किंबहुना, धर्ममार्तंडांच्या परवानगीशिवाय सातासमुद्रा पार अमेरिकेत गेल्यामुळे विवेकानंदांना सामाजिकरित्या बहिष्कृत केले गेले होते. मुळातच विवेकानंद हे एक वेगळ्या प्रकारचे क्रांतिकारक होते.

युवकांचे एक लक्षण आहे की ते क्रांतीशी, परिवर्तनाशी संबंधित असतात हे खरे आहे; परंतु आपण युवक कोणाला म्हणायचे हे मुळात ठरवायला हवे. युवकांचा उद्देश हा जगण्यातून मिळणार्‍या आनंदाशी असतो. जगताना मिळणार्‍या पैशांशी त्यांचा संबंध नसतो. जेव्हा आपण पैशांचाच विचार करायला लागतो, तेव्हा आपण ‘युवक’ राहात नाही. त्यादृष्टीने विचार करता वयोमानेच्या मर्यादेमध्ये किंवा व्याख्येमध्ये बसणारे किंवा वयाने युवक असणारे खूप जण अवतीभवती पाहतो; मात्र यातील अनेकांचे जीवन केवळ पैशांशी संबंधितच असल्यामुळे ते युवक आहेत का हा खरा प्रश्‍न आहे.

पैशांच्या हिशेबांच्या स्वरुपात जगण्यातील यशापयश आणि आनंदाकडे जे पहात असतत आणि जे उद्देशांसाठी जगणे विसरतात त्यांचा क्रांतीशी संबंध राहात नाही. त्यामुळे विवेकानंदांच्या विचारांशी संबंध अथवा संपर्कच नसलेले अनेक युवक आज या युवक श्रेणीत सहभागी आहेत आणि अशा युवक या केवळ वयाने व्याख्येत येणार्‍या लोकांंसाठी काम करणार्‍या संघटनाही आज अनेक आहेत. विवेकानंदांचे नाव घेऊन काम करणार्‍या अनेक संघटना या क्रांती म्हणजे राजकीय स्वरुपाचीच असते अशा प्रकारची मांडणी करीत आहेत. ही क्रांती राजकीय बदल घडवून आणण्यासाठीचीच असते.

वस्तुतः, सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक परिवर्तन यासंदर्भात युवकांची भूमिका महत्त्वाची असते. एका तत्त्ववेत्याने असे म्हटले होते की, तुमच्या देशातील युवक कोणते गाणे म्हणतात ते सांगा, मी तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो. त्या अर्थाने पाहिल्यास सनबर्न ङ्गेस्टिवलसारख्या आरडाओरडा करून विव्हळणार्‍या स्वरुपाची गाणी म्हणणार्‍यांसाठी उभे राहून धुंद होणार्‍यांची गर्दी ही युवकत्त्व या संकल्पनेमध्ये न बसणारी आहे. पोखरलेल्या युवकत्त्वाचे ते निदर्शक आहे.

आज आपल्याकडील विविध पक्षांचे कित्येक युवानेते रात्रभर हॉटेल्स सुरु राहिली पाहिजेत, नाईट लाईङ्ग सुरु करा अशी मागणी करतात. लोकप्रियता मिळवण्यासाठी युवकांमध्ये अशा घोषणा केल्या पाहिजेत असा त्यांचा समज आहे. त्यांच्यापुढे युवाशक्तीला विधायक दिशेने नेणारा विचार नसून स्वहिताचा विचार त्यांच्यापुढे आहे. इतरांचे ‘लाईङ्ग’ विपन्नावस्थेत आहे, याचा विचार करण्याची त्यांना गरज वाटत नाही. अशा प्रकारचे युवानेते समाजात असणे ही एक अधोगामी स्वरुपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजामध्ये अनेक जण नवनिर्माणाचे काम खर्‍या अर्थाने करताहेत. ठिकठिकाणी ङ्गिरताना असे खर्‍या अर्थाने युवक असणारे अनेक जण मी वाड्यावस्त्यांवर पाहिले आहेत.

कायदेविषक क्षेत्रात माझ्यासोबत अनेक वकिल आहेत जे न्यायासाठी भांडण्याचा विचार करताना दिसतात. त्यांचा उद्देश न्याय मिळाला पाहिजे हा आहे. यासाठी ते पैसा मिळवणे हा उद्देश बाजूला ठेवून संघर्ष करीत आहेत, कोर्टामध्ये झगडत आहेत. त्यांची काळजीही समाज घेतो, हेदेखील पुढे आलेले आहे. त्यांना आम्ही मदत करू असे म्हणणारे अनेकजण आज समाजात पुढे येत आहेत. दुसरीकडे शाळांमधून मिळणार्‍या शिक्षणाचा दर्जा खालावत असताना, सरकारी शाळा बंद होत असताना, शिक्षणाचे खासगीकरण होत असताना, कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा काढण्याची परवानगी दिली जात असताना खेड्यापाड्यांमधील मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आपली आहे असे मानून काम करणारे अनेक जण आहेत. चार-पाच दिवस शहरात काम करून दोन दिवस खेड्यातील मुलांना जाऊन शिक्षण देऊ अशी काहींची भूमिका आहे. काही जण सिग्नलवर, ङ्गुटपाथवर शाळा चालवताहेत. भिकारी होण्यापासून मुलांना बाहेर आणणार्‍या काही व्यक्ती आहेत. वेश्यांच्या मुलंासाठी काम करणारे काही युवक आहेत. अनेक जण एचआयव्ही झालेल्या मुलांसोबत त्यांच्या हक्कांसाठी, त्यांना चांगले जीवनमान मिळावे यासाठी काम करत आहेत.
माझ्या मते या वाटेवरील सर्व जण हे खर्‍या अर्थाने ‘युवक’ आहेत. धकाधकीच्या, ताणतणावाच्या, स्पर्धेच्या जीवनातही आपण काही तरी सकारात्मक, रचनात्मक करत राहायचे या मनोभूमिकेने कार्यरत असणार्‍या या ‘युवकांना’ कोणाही महापुरुषाचे नाव घेण्याची गरज वाटत नाही. आपण त्यांचे विचारच अमलात आणायचे या धारणेने ते कार्यरत आहेत. युवादिनाचे महत्त्व त्या सर्व युवकांसाठी आहे जे युवक असणे किंवा युवकपण जगतात. तरुणाईची एक झिंग असते. त्यामध्ये बदल घडवून आणण्याची, परिवर्तनाची आस असते. अन्यायाची चीड असते. ही चीड माझ्यापुरती किंवा तडङ्गडण्यापुरती मर्यादित न ठेवता त्याचे परिवर्तनात रुपांतर करणे आाणि लोकशाहीच्या माध्यमातून बदल घडवून आणणे अशी एक भूकच आपोआप निर्माण होते. हे मी स्वतःही अनुभवलेले आहे. त्यातून युवकपण प्रतीत होते. शहरी भागामध्ये डोंगर टेकड्या हिरवेगार करणारे, प्लास्टिक बाटल्या उचलून पर्यावरणाची हानी रोखणारे, समुद्रकिनारे साङ्ग करणारे, कासव वाचवण्यासाठीच्या मोहीम राबवणारे, कासव महोत्सव सुरू करणारे हे सर्व प्रयत्नशील समाजघटक युवक या व्याख्येमध्ये बसण्यास खर्‍या अर्थाने पात्र आहेत.

युवादिनाच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, ज्यात अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ही १९ ते ३५ वयोगटातील आहे. भारताची ही तरुण लोकसंख्या जोपर्यंत ‘परङ्गॉर्मिंग ऍसेट’मध्ये रुपांतरित केली जात नाही, तोपर्यंत खर्‍या अर्थाने भारताला ‘डेमोग्राङ्गिक डिव्हिडंट’चा ङ्गायदा घेता येणार नाही. याचाच अर्थ असा की या तरुणांमध्ये कौशल्य निर्माण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. भारतात दरवर्षी साधारणतः २ कोटी जण वयाची १८ वर्षे पूर्ण करतात. १९ ते २९ या वयोगटातील २० कोटी तरुण आहेत ज्यांना रोजगाराची गरज आहे. त्याचबरोबर २०२० पर्यंत भारताचे सरासरी वय २७ वर्षे असणार आहे. त्यामुळे आगामी काळात रोजगारनिर्मितीचा प्रश्‍न आणखी मोठा बनणार आहे याची चिंता सातत्याने व्यक्त होते. माझ्या मते याचे मूळ आपल्या शिक्षणव्यवस्थेत आहे. समस्या निर्माण होण्याचे मूळ रोजगारकेंद्रीत शिक्षणव्यवस्था आहे. प्रत्यक्षात शिक्षणव्यवस्था ज्ञानकेंद्री असली पाहिजे. त्यातून प्रत्येकाने मला काय घडवायचे आहे हे ठरवले पाहिजे. मात्र आतापर्यंत आपल्याकडे केवळ पैसे मिळवण्यासाठी शिक्षण अशा मांडणीतून शिक्षण दिले गेले आहे. त्यातून आपली खूप मोठी दिशाभूल झाली आहे आणि बेरोजगारीचा प्रश्‍नही त्यातूनच निर्माण झाला आहे.

यातील आणखी एक पैलू म्हणजे आपली विकासाची संकल्पना. महात्मा गांधींचा विकासाला विरोध नव्हता. त्यांचा टेलिङ्गोनला, रेल्वेला विरोध नव्हता. मात्र गांधीजी म्हणत असत की यंत्रांचा सहभाग आपल्या जीवनात तेवढाच असला पााहिजे की माणसांच्या दोन हातांना कामही मिळाले पाहिजे. आज यंत्रकेंद्रीत विकासाच्या संकल्पनेमुळे माणसांच्या हातांची किंवा रोजगारांची वजाबाकी होत आहे. आज भारताची लोकसंख्या प्रचंड आहे त्यामुळे यंत्रांचा वापर करताना वेगळा विचार करावा लागणार आहे. शंभर जणांचे काम करणारे एकच यंत्र आपल्याला नको आहे हे समजून घेण्यामध्ये अपयश आले आहे. त्यामुळे आपली खूप मोठी दिशाभूल झाली आहे. जर हा देश युवककेंद्री होणार असेल, सर्वांत कमी वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त असणारा देश होणार असेल तर इथे रोजगारांच्या संधी प्रचंड असणे आवश्यक आहे. आज अमेरिकेसारख्या देशांमध्ये राष्ट्रवादाची भूमिका पुढे येत आहे. स्थानिकांना, भूमीपुत्रांना प्राधान्य देण्याची धोरणे आखली जात आहेत. थोडक्यात, परदेशातील नोकरीच्या संधींचे दरवाजे बंद होत आहेत. अशा वेळी देशांतर्गत रोजगारसंधी वाढत नसतील तर त्यातून असंतोष, गुन्हेगारी वाढत जाईल, गुन्हेगारीसाठी स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होत जाईल. म्हणूनच तरुणांचा देश म्हणून पाठ बडवून घेताना अथवा अभिमान वाटून घेताना या आव्हानांचाही विचार केला गेला पाहिजे.