खनिज, बॉक्साईट आदी खनिजांच्या सरकारला मिळणार्या रॉयल्टीत वाढ करण्यास काल केंद्र सरकारने मंजुरी दिली. यामुळे खनिज असलेल्या राज्यांचा महसूल वाढण्यास मदत होईल. एकुण ५५ प्रकारच्या खनिजांवर ही रॉयल्टी वाढवली आहे. सर्व राज्यांचे मिळून सुमारे १५ हजार कोटी रु. वार्षिक उत्पन्न त्यामुळे वाढेल. छत्तिसगढ, उदिशा, गोवा, कर्नाटक, झारखंड आदी ११ राज्यांत खनिज आहे.