खनिज डंपच्या लिलावासाठी निविदांची नोटीस जारी

0
6

राज्य सरकारने राज्यातील विविध ठिकाणी पडलेल्या खनिज डंपच्या ई-लिलावासाठी निविदा आमंत्रित करणारी नोटीस जारी केली आहे. खनिज डंपचा ई-लिलाव एमएसटीसी ई लिलाव पोर्टलवर केला जाणार आहे. या खनिज डंप ई-लिलावासाठी निविदा विक्रीला सुरुवात झाली आहे. तांत्रिक पात्र बोलीदाराची घोषणा 20 जानेवारी 2025 रोजी केली जाईल तर ई-लिलाव 22 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. गोव्यातील डंपसाठी सुधारित ई-लिलाव धोरणाने खाण कंपनीसाठी ई-लिलावात सहभागी होण्यासाठी रु. 25 कोटी ते रु. 45 कोटी निव्वळ संपत्ती असणे अनिवार्य केले आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये खनिज डंप धोरणामध्ये दुरुस्ती केली आहे. राज्यात खासगी जागेत पडून असलेल्या डंपचा ई लिलाव केला जाणार आहे.