मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुसऱ्या टप्प्यातील 5 खाणपट्ट्यांच्या लिलावात खाण पट्ट्याच्या यशस्वी बोलीदार खाण कंपन्यांना इरादा पत्रांचे वितरण काल केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील यशस्वी बोलीदार कंपन्या वेदांत, फोमेतो ग्रुप, जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड आणि के इंटरनॅशनल या कंपन्यांना इरादा पत्राचे वितरण करण्यात आले आहे. अडवालपाल-थिवी, कुडणे-करमळे, कुडणे, थिवी-पीर्ण आणि सुर्ला-सोनशी या पाच खाण पट्ट्यांच्या यशस्वी बोलीदारांना इरादा पत्रे देण्यात आली आहेत. राज्यातील आत्तापर्यंत 9 खाण पट्ट्याचा यशस्वी लिलाव करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यातील 4 खाण पट्ट्याच्या लिलावातील यशस्वी बोलिदारांना इरादा पत्रे यापूर्वीच वितरित करण्यात आली आहे. राज्यातील खाण व्यवसाय लवकरच पुन्हा सुरू होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.