क्वारंटाईन शुल्क आकारणीबाबत सीमॅन असोसिएशनची याचिका

0
156

येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवन सीमॅन असोसिएशन ऑफ इंडियाने एक याचिका दाखल करून सरकारच्या खलाशांकडून क्वारंटाईन शुल्क आकारण्याचा निर्णयाला आव्हान दिले आहे.

न्यायालयाने सरकारला नोटीस जारी केली असून या याचिकेवर बुधवार २० मे रोजी सुनावणी होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात परतणार्‍या गोमंतकीय खलाशांना क्वांरटाईन करण्यासाठी शुल्क आकारले जात आहे. गोमंतकीय खलाशांकडून थेट शुल्क आकारले जात नाही. तर, खलाशांना आणणार्‍या कंपन्यांकडून क्वारंटाईन शुल्क आकारले जात आहे. खलाशांसाठीच्या क्वारंटाईन शुल्कावरून वादविवाद सुरू झालेला आहे. खलाशांसाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करण्याची मागणी काही जणांकडून केली जात आहे.