अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या क्लॉडिया गोल्डिन यांना काल जाहीर झाला. नोबेल पुरस्कार पटकावणाऱ्या क्लॉडिया गोल्डिन या यंदाच्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. महिला श्रमशक्ती, उत्पन्नातील फरक स्पष्ट केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. क्लॉडिया गोल्डिन यांनी महिला श्रम शक्ती, स्त्री-पुरुषांतील कमाईतील तफावत, नोकरीच्या ठिकाणी मिळणारे असमान उत्पन्न, शिक्षणसारख्या अनेक विषयांत अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे.