भारत बायोटेकची कोरोनाविरोधी लस ‘कोवॅक्सीन’ १२ वर्षांवरील मुलांना देण्यास भारतीय औषध नियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटची लस मात्र १८ वर्षांवरील मुलांनाच दिली जाणार आहे. कोरोना विषयक तज्ज्ञ समितीच्या शिफारशीवरून रविवारी भारत सरकारने दोन्ही लशींना मान्यता दिली आहे. मात्र, यापैकी भारत बायोटेकच्या लशीला तिसर्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी होण्यापूर्वीच देण्यात आलेल्या परवानगीवरून प्रश्न उपस्थित केले गेल्याने काल सदर कंपनीने आमची लस देशी उत्पादन आहे म्हणून तिला कमी लेखू नका असे आवाहन केले.
भारत सरकारच्या औषध नियंत्रकांनी भारत बायोटेकची लस ‘कोवॅक्सीन’ सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची सुरक्षाविषयक चिंता असलेल्या कोणत्याही लशीला सरकार संमती देणार नसून सध्या मान्यता दिलेल्या दोन्ही लशी ११० टक्के सुरक्षित आहेत असे स्पष्ट केले आहे.