कोविड-१९ भाग – १

0
250

–  डॉ. स्वाती हे. अणवेकर,
(म्हापसा)

अन्य देशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीने अथवा अशा व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या स्थानिक व्यक्तीने देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून आरोग्य खात्याला ही माहिती नीट पुरवल्यास त्या व्यक्ती अन्य कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आल्या होत्या हे कळले व त्यांना विलगीकरणात ठेवले तर त्याचा पुढे होणारा प्रसार नक्कीच टाळता येऊ शकतो.

ह्यापूर्वी आपण कोरोना संदर्भात एक लेख आधीच पाहिला आहे ज्यात आपण त्यावेळी उपलब्ध असणारी माहिती व त्या अनुषंगाने काय काळजी घ्यावी हे पाहिले. पण आता ह्या घडीला पाहता असे दिसते आहे की ह्या विषाणूने जगभरात बरेच थैमान माजवले आहे. बर्‍याच जणांचे बळी ह्या आजाराने घेतले आहेत. काहीजण ह्या आजाराच्या विळख्यातून सुखरूप बचावलेदेखील आहेत. आता आपल्या देशामध्येही ह्याचा प्रसार वाढत चालला आहे. अन्य देशांच्या तुलनेत जरी ह्याचे प्रमाण बरेच कमी असले तरीसुद्धा आपण सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक वागणे आवश्यक आहे. आता हेच पहा ना, काही अन्य लोकांच्या स्वार्थी व निष्काळजीपणाचा दुष्परिणाम आपल्या गोव्याच्या जनतेला भोगावा लागतो आहे. कारण आपला गोवा आता हिरव्या झोन मधून ऑरेंज व लाल झोनमध्ये आला.

पूर्वीच्या लेखामध्ये आपण हे पाहिले की ह्याचा संसर्ग ड्रॉपलेट इन्फेक्शन द्वारा होतो. आता समाजामध्ये ह्याचा प्रसार भराभर कसा झाला ते जाणून घेऊया. ह्यातील पहिल्या प्रकाराला म्हणतात :-
१) इम्पोर्टेड केसेस :- ह्यामध्ये अन्य देशांतून प्रवास करून येणारी व्यक्ती ह्या विषाणूने बाधित असते व ती आपल्या देशात अर्थात स्वदेशात परत येते.
२) लोकल ट्रान्समिशन :- हा दुसरा प्रकार असून ह्यामध्ये स्थानिक व्यक्ती स्वतः अन्य देशातून प्रवास करून आलेली नसली तरी ती परिचित अशा प्रवासाचा इतिहास असणार्‍या व्यक्तीच्या संपर्कात येते व कोरोनाबाधित होते.

हे वरील दोन्ही प्रकारातील संक्रमण हे आपण आटोक्यात ठेऊ शकतो कारण ह्यामध्ये अन्य देशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तीने अथवा अशा व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या स्थानिक व्यक्तीने देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून आरोग्य खात्याला ही माहिती नीट पुरवल्यास त्या व्यक्ती अन्य कोणकोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आल्या होत्या हे कळले व त्यांना विलगीकरणात ठेवले तर त्याचा पुढे होणारा प्रसार नक्कीच टाळता येऊ शकतो.

पण पुढील दोन प्रकार अत्यंत धोकादायक आहेत :-
३) र्उेााीपळींू डिीशरव (कम्युनिटी स्प्रेड) :-
ह्यामध्ये एका व्यक्तीकडून अन्य अनेक व्यक्तींना संक्रमण होते. ज्यामध्ये मूळ संक्रमित व्यक्ती ही अन्य व्यक्तींना ओळखत नसते व जेव्हा असे संक्रमण होते ज्यात एक व्यक्ती दुसर्‍या संक्रमित व्यक्तीला ओळखत नसते तेव्हा ती आपण कोणकोणाला भेटलो हे नेमके सांगू शकत नाही. तसेच किती सार्वजनिक ठिकाणांना भेट दिली हे सांगू शकत नाही. बरेचदा अशा व्यक्तींमध्ये काही शारीरिक लक्षणेदेखील आढळत नाहीत जे जास्त धोकादायक आहे. हे असे संक्रमण बाजार, सुपर मार्केट, सार्वजनिक वाहनातून प्रवास अशा माध्यमातून भराभर पसरत जाते.

४) एळिवशाळल/झरपवशाळल (एपिडेमिक/पँडेमिक) :-
ह्यामध्ये प्रसार हा एका देशातून दुसर्‍या देशात होतो व त्याला भयंकर महामारीचे स्वरूप प्राप्त होते. जसे सध्याच्या परिस्थितीत आढळून आले आहे.

ह्या व्याधीचा धोका हा जरी सर्वांनाच असला तरी त्यातसुद्धा काही अशा व्यक्ती आहेत ज्यांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. ह्यात १० वर्षाखालील मुले व ६५ वर्षावरील व्यक्ती ह्यांचा समावेश होतो. तसेच ज्यांना आधीच मधुमेह, हृदय विकार, फुफ्फुस विकार, वृक्क विकार, यकृत विकार, कर्करोग असे आजार असतील त्यांना ह्याची लागण लगेच होण्याचा धोका जास्त असतो. तसेच ज्या व्यक्ती Aऍनिमिया, थॅलेसेमिया ह्या आजाराने ग्रासित आहेत त्याचप्रमाणे काही व्यक्ती जर एखाद्या आजारावर उपचार म्हणून अशी औषधे सेवन करत असतील ज्यामुळे त्यांच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असेल तर त्यांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे.
तसेच ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्या व्यक्ती नुकत्याच एखाद्या भयंकर आजारातून बर्‍या झाल्या आहेत किवा ज्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे अशांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण ह्या सर्व व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारशक्ती फार कमी असते. त्यामुळे ह्यांना जर कोरोनाची बाधा झाली तर त्यांना आधीच प्राथमिक आजार असल्याने त्यांना होणारे संक्रमण हे भयंकर स्वरूपाचे होणार असून त्यातून मग त्या रुग्णाची बरे होण्याची शक्यता अगदी कमी असेल.
(क्रमशः)