राज्यातील काही भागात काल जोरदार पाऊस कोसळला. दक्षिण गोव्यातील कोलवा व बाणावली तसेच अन्य काही भागांत काल बुधवारी रात्री 10.30च्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सदर भागांतील लोकांची तारांबळ उडाली. राज्यातील किनारपट्टी भागांत ढग दाटून आले होते. राज्य हवामान खात्याने बुधवारी रात्री 10:30 वाजल्यापासून पुढील चार-पाच तास सासष्टी व केपे तालुक्यातील काही भागांत पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली होती. सासष्टीतील कोलवा व बाणावली येथे पाऊस कोसळल्याने ती शक्यता खरी ठरली.
दरम्यान, जानेवारी महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याची मागच्या कित्येक वर्षांतील ही पहिलीच घटना आहे. ढगाळ वातावरण व पावसाच्या पार्श्वभूमीवर काल भर हिवाळ्यात राज्यातील उष्मा वाढला होता.