कोलवा प्रकरणातील ‘त्या’ महिलेविरोधात गुन्हा नोंद

0
5

कोलवा पोलीस स्थानकाचे उपनिरिक्षक विभिनव शिरोडकर यांनी अमानुषपणे मारहाण केल्याची तक्रार केलेल्या एल्मिरा दोरादो हिच्यासह तिचा पती साईराज नाईक व अन्य एकावर ट्रकचालकाने तीन लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वेर्णा पोलिसांनी नोंद केला आहे. ट्रक चालक महिराय बिष्णोई (बिकानेर, राजस्थान) याने तक्रार नोंदविली आहे.

या तक्रारीनुसार बेतलभाटी येथील ड्रीम लाईफ प्रा. लिमिटेड कंपनीसाठी हा ट्रक राजस्थान येथून माल घेवून आला होता. 20 जून रात्री साडेबाराच्या सुमारास उतोर्डा जंक्शनवर त्याने मोटरसायकलवरील माणसाना कंपनीचा पत्ता विचारला. त्यांनी पत्ता दाखवतो असे सांगून ट्रकला आपल्या पाठोपाठ येण्यास सांगून निर्जन स्थळी नेले. ट्रक चालकाला खाली उतरवून 3.12 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर सूरा दाखवून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरून 100 क्रमांकावर फोन केला तेव्हा कोलवा पोलिस तेथे पोहचले. त्यानंतर ही घटना घडली. पण महिलेला मारहाण करणे व रात्री अटक करणे व आपल्या कार्यक्षेत्रात येत नसताना मारहाण केल्याने या प्र्रकरणात पोलिस उपनिरिक्षक अडकला आहे.