कोलवाळ कारागृहात एका कैद्यावर हल्ला

0
41

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी सकाळी एक कच्चा कैदी गजेंद्र सिंग उर्फ छोटू याच्यावर आसिफ व इम्तियाज या दोघां कैद्यांनी प्राणघातक सुरी हल्ला केल्याची घटना घडली. गजेंद्र सिंग याच्यावर कळंगुट येथील सोझा लोबो रेस्टॉरंटमध्ये तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला असल्याने त्याला कोलवाळ कारागृहात ठेवण्यात आले आहे. या हल्ल्यात गजेंद्र सिंग हा किरकोळ जखमी झाला असून, उपजिल्हा इस्पितळात उपचारानंतर त्याला पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे. तसेच संपूर्ण घटनेचा अहवाल तुरुंग महानिरीक्षकांना देण्यात येणार आहे, असे अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक वासुदेव शेटये यांनी स्पष्ट केले आहे.