खून प्रकरणी कोलवाळ तुरुंगात शिक्षा भोगणारा एक कैदी शैलेश मापारी (३४) याचे काल म्हापसा येथील इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले असता निधन झाले.
काल न्यायालयात सुनावणीदरम्यान भोवळ येऊन पडल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात हलवण्यात आले होते.
२००४ साली सागर चोडणकर याच्या खून प्रकरणी त्याला न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, संशयास्पद स्थितीत त्याचा मृत्यू ओढवला.