कोरोना महामारीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात येणार आहे. चीनसह अनेक देशांत पुन्हा वाढणार्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
विदेशात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने सतर्क राहण्याची गरज आहे, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात मागील चोवीस तासांत नवीन ४२९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यात नवीन केवळ १ कोरोनाबाधित आढळून आला. परिणामी सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १४ एवढी झाली आहे.