कोरोनाचा फटका बसलेल्या जगातील अन्य देशांच्या तुलनेत दर एक लाख लोकसंख्येमागील कोरोना मृतांचे भारतातील प्रमाण सर्वात कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालात नमूद केले आहे. दर एक लोकसंख्येमागील कोरोना मृतांचे प्रमाण ६.०४ असे असून भारतातील हे प्रमाण १.०० असे आहे, अशी माहिती २२ जून २०२० रोजीच्या अहवालात देण्यात आली आहे.
डब्ल्युएचओच्या या अहवालानुसार इंग्लंडमध्ये प्रती एक लाख लोकसंख्येमागे ६१.१३ एवढे कोरोना मृत्यूचे प्रमाण आहे. तर स्पेन, इटली व अमेरिका या देशांमधील हे प्रमाण अनुक्रमे ६०.६०, ५७.१९ आणि ३६.३० एवढे असल्याचे अहवालात म्हटले आहे.
भारतात कोरोना रुग्णांचा लवकर शोध, योग्य वेळेत चाचणी, टेहळणी, सहतत्यपूर्ण रुग्ण संपर्क शोध घेणे व परिणामकारक आरोग्य व्यवस्थापन यामुळे कोरोना मृतांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे शक्य झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. संसर्ग प्रसार रोखणे, संबंधित क्षेत्र प्रतिबंधित करणे व कोविड-१९चे प्रभावी व्यवस्थापन राज्य सरकारे व संघ प्रदेश यांच्यासह भारत सरकारने केल्याची प्रचिती यावरून स्पष्ट झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
रुग्ण बरे होण्याचे भारतातील प्रमाण सुधारत आहे. कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचे भारतातील प्रमाण ५६.३८%. गेल्या २४ तासांत १०,९९४ कोविड-१९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या भारतात १,७८,०१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सध्या भारतातील रिअल-टाइम पीसीआर आधारित एकूण चाचणी प्रयोग झाला. ५५३ (सरकारी-३५७+खाजगी-१९६), ट्रूनेट प्रयोगशाळा : ३६१ (सरकारी-३४१+खाजगी-२०), सीबीएनएएटी आधारित : ७८ (सरकारी-२८+खाजगी ५०).
गेल्या २४ तासांत १,८७,२२३ नमूने चाचणीसाठी घेण्यात आले असून आतापर्यंतची ही संख्या ७१,३७,७१६ अशी आहे.