कोरोना जेएन.1 चे देशात 1200 रुग्ण

0
36

प्रशासन सतर्क, बहुतेक राज्यांत फैलाव

देशात कोरोनाचा संसर्ग वाढला असून यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नवीन जेएन.1 या उपप्रकारामुळे नव्या कोरोना रुग्णांची भर पडत असून हा आकडा सध्या 1200 हून अधिक झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनही अलर्टवर आहे. गेल्या एका महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 609 नवीन कोरोनाबाधित आढळले असून तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात नवीन कोरोना व्हेरियंट जेएन.1 वेगाने पसरत आहे. देशात या प्रकाराचे 1200 हून अधिक रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

कोणत्या राज्यात किती ?

नवीन आकडेवारीनुसार, कोरोनाच्या जेएन.1 या उपप्रकाराचे सर्वाधिक रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले आहेत. कर्नाटकमध्ये या प्रकारचे 215 हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश असून तिथे 189 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 170 रुग्ण आढळले असून केरळमध्ये 154 रुग्ण, पश्चिम बंगालमध्ये 96 रुग्ण, गोव्यात 90 रुग्ण, तामिळनाडूमध्ये 88 रुग्ण आणि गुजरातमध्ये 76 रुग्ण तेलंगणा आणि राजस्थानमध्ये 32 रुग्ण, छत्तीसगडमध्ये 25 रुग्ण, दिल्लीमध्ये 16 रुग्ण, उत्तर प्रदेशात 7 रुग्ण, हरियाणामध्ये पाच रुग्ण, ओदिशामध्ये तीन रुग्ण याशिवाय उत्तराखंड आणि नागालँडमध्ये एक-एक रुग्णांची नोंद झाली आहे.