कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी तसेच या कठीण प्रसंगी लोकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे त्याची माहिती मुख्यमंत्र्यानी आकाशवाणी व अन्य माध्यमाव्दारे रोज ठरावीक वेळी द्दावी ,अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी केली आहे
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सकाळी पणजी,मडगांव ,फोंडा,वास्को आदी शहरात लोकांची झुंबड उडाली.भाजी व मासळीवाले अवाच्या सव्वा दर लावून लुट करीत असल्याची नागरिकांची तक्रारी
गोव्यात कोविड तपासणी लँब लवकरच सुरू करण्यात येणार आहे. चार डॉक्टराचे पथक प्रशिक्षणासाठी खास विमानाने पुणे येथे रवाना.
गोव्याबाहेर शिक्षण घेणा -या व सध्या गोव्याबाहेरच असलेल्या विद्याथ्र्यांनी तेथेच राहणे पसंत करावे.ते आता गोव्यात आल्यास त्याना सामाजिक विलीनीकरणा सामोरे जावे लागेल.त्यांना इस्पितळात येऊन स्वत:ची तपासणी करून घ्यावी लागेल व त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांना 14दिवस इस्पितळात ठेवण्यात येईल व लक्षणे आढळली नसल्यासही त्यांना चौदा दिवस स्वत:च्या घरीच थांबावे लागेल-मुख्यमंत्री
गोवा सरकारने राज्यातील दहावीच्या परिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकळण्याची गरज असून मुख्यमंत्र्यानी त्यासंबंधीची घोषणा करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी केली आहे
आम आदमी पार्टीचे सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर यानी काल मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्राव्दारे राज्यातील लोकांना औषधे व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याची मागणी केली.त्यासाठी स्वयंसेवकांची मदत घ्यावी ,अशी सूचना त्यानी केली आहे
विदेशातून अथवा अन्य राज्यातून हल्लीच्या काळात गोव्यात आलेल्या काही लोकाना त्यांच्या हातावर शिक्का मारून पुढील चौदा दिवस त्यांच्या घरी थांबण्यास सांगितलेले असून अशा लोकांपैकी कुणी जर बाहेर आले व त्यांनी सामाजीक विलगीकरणाचा भंग केला तर त्यांना ताब्यात घेऊन वेळ पडल्यास चौदा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात येईल असा इशारा काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी दिला