कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे निर्बंध गरजेचे असून या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नव्या रुग्णांची संख्या कमी झाली असून कोरोना मुक्त झालेल्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी म्हटले आहे.
रुग्णसंख्या कमी होत असली तरी सध्याची रुग्णसंख्या अद्यापही जास्त आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यांनी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार निर्बंध लागू करावेत अशी सूचना केली आहे.

